देयकासाठी ५० लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागातील ३ अधिकाऱ्यांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला जलसंधारण विभाग !

चंद्रपूर – नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे त्या कामाचे देयक काढायचे होते. त्यासाठी जलसंधारण विभागातील ३ अधिकाऱ्यांना तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही घटना २ मे या दिवशी घडली. ब्रह्मपुरी येथील प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूर येथील जलसंधारण विभागातील अधिकारी कविजीत पाटील आणि चंद्रपूर येथील जलसंधारण कार्यालयातील लेखाधिकारी रोहित गौतम अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या तिघांनी तक्रारदाराकडे ८१ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ५० लाख रुपये द्यायचे ठरले होते. (प्रतिमास ५० सहस्र ते लाखो रुपयांचे वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही असे अधिकारी लाच घेत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना बडतर्फच करायला हवे. तसेच त्यांनी अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती जप्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी ! – संपादक)