मान्सून ४८ घंट्यांत बंगालच्या उपसागरात येणार !

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक – यंदा मान्सून ४ दिवस अगोदरच येणार आहे. सध्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती होत आहे. आगामी ४८ घंट्यांत मान्सून बंगालच्या उपसागरात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. १४ मे या दिवशी वर्धा येथे सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती, तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा कमाल तापमानात ३.५ ने वाढ झाली आहे.