नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या कारागृहात आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यावरून १५ मे या दिवशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे पत्रकारांना म्हणाल्या की, इतर लोक बोलणार नाहीत; पण मी बोलेन. फार फार काय होईल, तर धाड पडेल; पण मी बोलणारच. अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालय यांवर १०९ वेळा धाड पडली आहे. हा जागतिक विक्रम आहे. हे पुष्कळ गंभीर प्रकरण आहे.