शांघाय (चीन) शहरात कोरोनामुळे दळणवळण बंदी

चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्रांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये कोणताही प्रसंग न वगळता ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित होणार !

एकीकडे भारतात या चित्रपटावरून धार्मिक द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्षांकडून केला जात असतांना आता एका इस्लामी देशात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याने त्यांना चपराक मिळाली आहे !

नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ आणि भारत-नेपाळ रेल्वे सेवेचे उद्घाटन

३ दिवसांच्या भारताच्या दौर्‍यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी २ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ (डेबिट आणि क्रेडिट कार्ड), तसेच भारत अन् नेपाळ यांच्यामधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते.

कॅनडामध्ये कॅथॉलिक चर्चकडून चालवण्यात येणार्‍या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणाचे प्रकरण

नुसती क्षमायाचना करून उपयोग नाही, तर याला उत्तरदायी असणार्‍यांना जगासमोर उघड केले पाहिजे. यांतील जे जिवंत आहेत, त्यांना शिक्षा केली पाहिजे आणि अशा घटना भविष्यात होणार नाहीत, यासाठी ‘व्हॅटिकन चर्च काय करणार आहे ?’, हेही घोषित केले पाहिजे !

अयोध्येतील मंदिरे, मठ आणि धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा कर रहित !  

अयोध्येतील मंदिरे, मठ आणि अन्य धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा व्यावसायिक कर रहित करण्यात करण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील नगरपालिकेला दिला.

कोरोनाचा ‘एक्सई’ हा नवा प्रकार ‘बीए-२’ पेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य ! – जागतिक आरोग्य संघटना

‘एक्सई’ हा कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या ‘बीए-२’ या उपप्रकारापेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य आहे;  परंतु याची निश्‍चिती करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित होऊ शकतात, तर नेपाळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का होऊ शकत नाही ?

जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित करता येत असेले आणि तेथील लोकशाही व्यवस्थाही कायम रहात असेल, तर नेपाळला लोकशाहीप्रधान ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?

राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० !

राज्यसभेत प्रथमच भाजपची सदस्य संख्या १०० झाली आहे. हा विक्रम करणारा भाजप वर्ष १९९० नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ अल्प, म्हणजे केवळ २९ झाले आहे.