पोप फ्रान्सिस यांच्याकडून क्षमायाचना
|
व्हॅटिकन सिटी – पोप फ्रान्सिस यांनी कॅनडातील कॅथॉलिक चर्चकडून चालवण्यात येणार्या विद्यालयाच्या वसतीगृहामध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी कॅनडातील मूलनिवासी लोकांची क्षमा मागितली आहे. त्यांनी म्हटले, ‘कॅथॉलिक नेत्यांमुळे जे काही सहन करावे लागले, त्यासाठी मला लाज वाटते आणि रागही येत आहे.’ कॅनडातील स्थानिक नेते आणि अन्य प्रतिनिधी यांच्या येथील बैठकीत ते बोलत होते. ते लवकरच कॅनडामध्ये जाणार असल्याचेही म्हटले आहे. कॅनडातील स्थानिक नेत्यांची मागणी होती की, पोप यांनी कॅनडामध्ये येऊन क्षमा मागावी.
The Bishops of Canada welcome Pope Francis’ request for pardon for the suffering inflicted on indigenous Canadians. Pope Francis has been meeting with delegations from Canada’s First Nations, Inuit and Métis peoples over the last few days.https://t.co/unWPATZBMp
— Vatican News (@VaticanNews) April 1, 2022
कॅनडातील एका आयोगाने त्याच्या वर्ष २०१५ च्या अहवालात म्हटले होते की, कॅनडामध्ये काही दशकांपूर्वी झालेल्या विद्यालयातील मूलनिवासींच्या मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांना उपाशी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. यात अनेक मुलांचा मृत्यू झाला. त्यांना या विद्यालयाच्या परिसरात पुरण्यात आले.