नवी देहली – ‘एक्सई’ हा कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या ‘बीए-२’ या उपप्रकारापेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य आहे; परंतु याची निश्चिती करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘एक्सई’ हा प्रकार सर्वप्रथम १९ जानेवारीला ब्रिटनमध्ये आढळून आला. तेव्हापासून याची ५०० हून अधिक रुग्णांना याची लागण झाली.