पवित्र नद्या प्रदूषणमुक्त करा !

भारतामध्ये नद्यांचे आध्यात्मिक माहात्म्य अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये याविषयी श्रद्धा आहे आणि ते त्यादृष्टीने नद्यांकडे पहातात. प्रशासनाने भाविकांचा भाव आणि स्वच्छ पाणी ही प्राथमिक आवश्यकता समजून नद्या समयमर्यादा ठेवून स्वच्छ कराव्यात, हीच अपेक्षा !

तलाठ्याच्या सख्ख्या भावावर वाळूचोरीची कारवाई !

माण तालुक्यात महसूल विभागाचा वाळू तस्करांना पाठिंबा असल्याचे उघड ! तलाठ्याचे नातलगच वाळूतस्करीत सहभागी असणे प्रशासनाला लज्जास्पद !

लवकरच सांगली-कोल्हापूर ‘पॅसेंजर रेल्वे’ चालू होणार ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २२ मासांपासून सांगली-कोल्हापूर ही ‘पॅसेंजर रेल्वे’ सेवा बंद आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याने रेल्वे विभागातील प्रमुखांशी चर्चा करून ‘पॅसेंजर रेल्वे’ लवकरात लवकरात चालू केली जाईल,

हेल्मेटचा वापर न करणार्‍या २७ पोलिसांची वाहने जप्त !

सर्वप्रथम पोलिसांनी नियमांचे पालन करावे यासाठी ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयाच्या जवळील विनाहेल्मेट असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवरही ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत कधी बोलणार ?

‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामी देशांच्या संघटनेने हिजाब प्रकरणावरून ‘भारताने मुसलमानांना, महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे.

दीर्घकालीन रुग्णाईत असतांना मतदानाला जाऊन राष्ट्राप्रती कर्तव्य बजावणारे राष्ट्रप्रेमी संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) !

‘१४.२.२०२२ या दिवशी गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक होती. त्यात माझ्या वडिलांना (पू. पद्माकर होनप यांना) मतदान करायचे होते. त्यांचे पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र नाशिक येथील होते.

आजचा काळ हा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेअगोदरच्या काळासमच !

निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !’

हिजाब परिधान करण्याची मागणी आणि त्या विरोधामागील राष्ट्रद्रोही षड्यंत्र !

‘शाळेत विद्यार्थ्यांना एक समान गणवेश असावा कि नाही ?’, या गोष्टीला वादाचे स्वरूप देऊन त्याला हिजाबपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. हिजाबचे कारण पुढे करून अराजक निर्माण करू पहाणार्‍या धर्मांध संघटनांवर बंदी घाला !

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत.