दीर्घकालीन रुग्णाईत असतांना मतदानाला जाऊन राष्ट्राप्रती कर्तव्य बजावणारे राष्ट्रप्रेमी संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) !

पू. पद्माकर होनप

‘१४.२.२०२२ या दिवशी गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक होती. त्यात माझ्या वडिलांना (पू. पद्माकर होनप यांना) मतदान करायचे होते. त्यांचे पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र नाशिक येथील होते. वडील गोव्यात स्थायिक झाल्याने त्यांनी तेथील निवडणूक ओळखपत्र अनेक प्रयत्नांनी गोवा येथे करून घेतले. बाबांना कर्करोग असून त्यांची आतापर्यंत ३ मोठी शस्त्रकर्मे झाली आहेत आणि १२ केमोथेरपी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुष्कळ थकवा असतो, तसेच अन्यही शारीरिक त्रास होत असतात, तरी ‘राष्ट्र आणि धर्मप्रेमी उमेदवार निवडून यावा’, या उद्देशाने त्यांना मतदान करायचे होते. मतदानाच्या दिवशी त्यांची केमोथेरपी चालू होती. आधुनिक वैद्यकीय पद्धतीनुसार या प्रकारच्या केमोथेरपीमध्ये बाबांना एका प्लास्टिक बाटलीतून (Infusor pump मधून) नळीद्वारे ४८ घंटे औषध दिले जाते. ही बाटली ते कापडी पिशवीत घालून गळ्यात अडकवून मतदानाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी मतदान केले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)