सोलापूर – येथे रस्त्यावरून हेल्मेटविना वाहन चालवणार्या २७ पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या २७ पोलिसांना १३ सहस्र ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त येण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे.
सर्वप्रथम पोलिसांनी नियमांचे पालन करावे यासाठी ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयाच्या जवळील विनाहेल्मेट असलेल्या पोलीस कर्मचार्यांवरही ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. (पोलीसच नियमांचे पालन करत नसतील, तर सामान्य नागरिकांना ते काय दिशा देणार ? – संपादक)