कोल्हापुरात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक आमदार, लोकप्रतिनिधी विनामास्क व्यासपिठावर उपस्थित !

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीच जर ‘मास्क’सारखे सामान्य नियमही पाळत नसतील, तर राज्यातील जनतेकडून ते पाळण्याची अपेक्षा कशी ठेवणार ?

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन ७ सहस्र ९०० जणांचे गुण वाढवले !

उमेदवारांना पात्र करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवतांना काही सांकेतिक शब्द (कोडवर्ड) दिले होते. त्यामुळे या उमेदवारांनी ओ.एम्.आर्. शीटमध्ये मार्क वाढवले असल्याचे समोर आले आहे

कोरोना संसर्गाच्या संदर्भातील निर्बंध आता अल्प केले जातील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

केंद्र आणि राज्य यांच्या ‘टास्क फोर्स’शी चर्चा करून ‘मास्क’विषयी पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात पत्रकारांना दिली.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा !

२ वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत प्रकरणात मृत्यूशी झुंज देणार्‍या अंकिता पिसुड्डे हिचा १० फेब्रुवारी २०२० या दिवशी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेला २ वर्षे पूर्ण झाली असून तिच्या दुसर्‍या स्मृतीदिनी लागणार्‍या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली फेरी

हिजाब घालून त्याचे समर्थन करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या राष्ट्रवादीच्या हिंदु महिलांनी हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी किती वेळा पुढाकार घेतला आहे ? यावरूनच केवळ लांगूलचालनाचे राजकारण करण्यासाठी हे चालू आहे, हे लक्षात येते.

हिजाबच्या आडून शरीयतचा अट्टहास !

धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर इतर संस्कृती मिटवण्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा कसा उपयोग करतात, त्याचेच ‘हिजाबची मागणी’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यावरून समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता स्पष्ट होते !

सामाजिक माध्यमांचा अयोग्य वापर !

कोणतेही श्रम न करता मिळणार्‍या प्रसिद्धीच्या मागे लागून कधी ही युवती आणि तिचे मित्र गुन्हेगारीच्या उंबरठ्यापर्यंत पोचले, हे त्यांनाही कळलेच नाही.

भिवंडी येथे ‘बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्रा’च्या वतीने काढ्याचे विनामूल्य वाटप !

याचा लाभ २५३ जणांनी घेतला. कोरोना संसर्गाच्या काळात सेवाकार्य करणार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भ्रूणहत्येमध्ये ५ वर्षांनंतरही सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती नाही !

भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये सरकारी अधिवक्ता न दिल्याने ५ वर्षे दिरंगाई होत असेल, तर महिलांवरील अत्याचार कधीतरी अल्प होतील का ? असे उदासीन प्रशासन काय कामाचे ?

पाकमधील हिंदूंसाठी भारत असा जाब कधी विचारणार ?

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीय दूतावासाच्या प्रमुखाकडे कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर विचारणा केली. तसेच याविषयी चिंता व्यक्त केली.