ठाणे, १० फेब्रुवारी (वार्ता.) – ‘बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्रा’च्या वतीने भिवंडी भागातील गणेशपुरी संचालित, नित्यानंद फार्मसी यांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरोनावर अत्यंत प्रभावी वनौषधी असलेल्या गुर्जो काढ्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ‘गुरुकृपा फार्मसी’चे मालक कु. प्रितेश पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी कैलासनगर वळपाडा येथे हे शिबिर भरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
शिबिराचे उद्घाटन समाजकल्याण न्यासाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील, दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे कोकण विभागीय सचिव डॉ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तुंगारेश्वर येथील ‘बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती उपचार केंद्रा’चे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पाटील, भिवंडी येथील ‘बालयोगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पती केंद्रा’तील सेवक श्री. अजित मेहेर, श्री. संतोष वारघडे, आरोग्य प्रतिनिधी, वळ गावातील माजी सरपंच, तसेच सौ. संगीता किशोर पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याचा लाभ २५३ जणांनी घेतला. कोरोना संसर्गाच्या काळात सेवाकार्य करणार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.