किर्लाेस्करवाडी (जिल्हा सांगली), ३० जानेवारी (वार्ता.) – मध्ये रेल्वेकडून पुणे-मिरज-लोंढा या मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी किर्लाेस्करवाडी ते भिलवडी या १४ किलोमीटर रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे किर्लोस्करवाडी ते भिलवडी मार्गावर नुकतीच घेण्यात आलेली विद्युत् रेल्वेची चाचणी यशस्वी झाली. मिरज ते कोल्हापूर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचीही चाचणी घेण्यात आली आहे. उर्वरित कामही गतीने चालू असून तेही लवकरात लवकर पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.