कोकणात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नद्यांतील गाळ काढला जाणार

कोकणातील नदीकाठच्या शहरांत सातत्याने निर्माण होणार्‍या पूरस्थितीविषयी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी नद्यांतील गाळ काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना संबंधित यंत्रणांना दिली आहे.

कुडाळ-वेंगुर्ला रस्त्याच्या कामासाठी देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाप्रमाणे रस्ताबंद आंदोलन करणार !

ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी प्रत्यक्ष, तसेच लेखी स्वरूपात वेळोवेळी मागणी केली; मात्र असंवेदनशील, निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वेंगुर्ला-कुडाळ रस्ताबंद आंदोलन करण्यात येणार !

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात दत्तजयंती उत्सव

पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या येथील श्री दत्तमंदिरात १८ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

२० डिसेंबरला पणजी येथे ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ तील विविध हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा महामेळावा

हिंदूविरोधी घटनांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात इथल्या हिंदू सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था, नाट्यमंडळे, भजन मंडळे इत्यांदींचे तसेच बहुसंख्य हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात येईल.

बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणाची केपे पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंद

जनरल बिपीन रावत हे गणवेश धारण केलेले एक राजकारणी आहेत, असा आरोप तावारिस यांनी केला होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांचे आमदारकीचे त्यागपत्र : ‘आप’मध्ये प्रवेश करण्याच्या सिद्धतेत

भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचे त्यागपत्र सुपुर्द केले. भाजपला सोठचिठ्ठी देऊन त्या ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर अनेक प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर येत असून या दिवशी ते ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राज्यातील १६६ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे अद्याप निलंबन नाही

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !