देहली दंगलीमागील उद्देश हिंदूंमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचाच ! – देहली न्यायालय

धर्मांधांकडून करण्यात येणारी प्रत्येक दंगल ही याच उद्देशाने करण्यात येत असते. अशा दंगली कायमच्या रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र पोलीस प्रत्येक वेळी शेपूट घालून हिंदूंनाच उत्तरदायी ठरवतात !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली !

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

वर्ष २०२२ पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

जगभरात वर्ष २०२२ पर्यंत कोरोना महामारी संपुष्टात येईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या संघटनेच्या १०० वैज्ञानिकांनी एक अहवाल सिद्ध केला आहे. यात हा दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तान दिवाळखोर देश झाला आहे !

पाकच्या महसूल मंडळाचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांचा घरचा अहेर ! पाकने चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामुळे एका पाकिस्तानी नागरिकावर ७५ सहस्र रुपये कर्ज झाले आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमधील नमाजपठणावर बंदी घाला !

मुसलमान आक्रमकांनी कह्यात घेतलेली धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी हिंदूंना न्यायालयीन लढा का द्यावा लागतो ? अशी सर्वच मंदिरे ‘मुक्त’ करण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही ?

‘बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा’, असे कर्नाटक विधानसभेत म्हणणारे काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांची क्षमायाचना !

अशा विधानासाठी केवळ क्षमायाचना पुरेशी नाही, तर त्यांची आमदारकी रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात टाकले पाहिजे !

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

‘तबलिगी जमात’वर भारतातही बंदी घाला ! – विहिंपची मागणी

तबलिगी जमातवर सौदी अरेबियाप्रमाणेच भारतातही बंदी घालावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. तसेच तिचे समर्थन करणारे ‘दारूल उलूम देवबंद’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

देशातील प्रत्येक नागरिकावर ३२ सहस्र रुपयांचे परदेशी कर्ज !

देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ३२ सहस्र रुपयांचे कर्ज असतांना आणि ते प्रतिदिन वाढत असतांना शासनकर्ते, प्रशासन, जनता यांना त्याचे काहीच गांभीर्य नाही आणि ते पैशांची उघळपट्टी करतांना दिसतात, हे भारताला लज्जास्पद !

उत्तर कोरियामध्ये माजी प्रमुखाच्या पुण्यतिथीनिमित्त हसणे, आनंदी रहाणे आदी अनेक कृतींवर ११ दिवस बंदी

हुकूमशाही कशी असते, त्याची सध्याच्या पिढीला झलक दाखवणारी घटना ! हिंदूंच्या प्राचीन इतिहासामध्ये अशा प्रकारचे शासनकर्ते कधीही झाले नाहीत, हे लक्षात घ्या !