२० डिसेंबरला पणजी येथे ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ तील विविध हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा महामेळावा

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) :  २० डिसेंबर २०२१ या दिवशी पणजी येथे ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ तील विविध हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा महामेळावा पणजी येथील गोमंतक मराठा समाजाच्या दयानंद स्मृती इमारतीतील राजाराम स्मृती सभागृहात दुपारी ४ वाजता होणार आहे. या महामेळाव्यात ‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यापूर्वी २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ ची स्थापना ७७ हिंदु संघटनांच्या १५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत पणजी येथे करण्यात आली होती.

विविध हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, सध्या भारतात हिंदू सुरक्षित नाहीत. संपूर्ण देशाप्रमाणे गोव्यातही हिंदूविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू आहेत. इथे अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवले जात आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या आतंकवादी संघटनेच्या देशविरोधी कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या देशविरोधी घोषणेवर उघड पुरावे असतांनाही कारवाई होत नाही. हिंदु नेते श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर मात्र काहीही कारण नसतांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक ६ मासांनी गोव्यात येण्यास बंदी घातली जात आहे. या हिंदूविरोधी घटनांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात इथल्या हिंदू सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था, नाट्यमंडळे, भजन मंडळे इत्यांदींचे तसेच बहुसंख्य हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात येईल. यासाठी धर्मांतरास विरोध, लव्ह जिहाद, नार्कोटीक जिहाद, भू जिहाद इत्यादी हिंदूविरोधी जिहाद; मंदिर सुरक्षा, धर्मशिक्षण समर्थन, हिंदु संस्कार समर्थन इत्यादी विषयांना प्राधान्य देऊन ‘हिंदू महारक्षा आघाडी’ आपले कार्य चालू करणार आहे. या महामेळाव्यासाठी विविध संस्था आणि संघटना यांचे किमान १ सहस्र प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. या महामेळाव्यासाठी हिंदू संघटनांनी त्यांच्या प्रतिनिधींची नोंदणी १७ डिसेंबर २०२१ पर्यंत आपल्या भागातील कार्यकर्त्यांकडे करावी, तसेच अधिक माहतीसाठी श्री. संदीप पाळणी भ्र.क्र. ९४२२६४३८०२ आणि श्री. सुरेश डिचोलकर भ्रमणभाष ९४२३३०७२७८ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.