सातारा जिल्‍ह्यात अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांची हानी !

अवकाळी पावसामुळे वाई आणि खटाव तालुक्‍यात ३५ ते ४० मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्‍यू झाला असून १० मेंढ्या अत्‍यवस्‍थ आहेत. विविध तालुक्‍यांत शेतात पाणी शिरले आहे. त्‍यामुळे गहू, ज्‍वारी, हरभरा आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठेपणा आणि आमचे यश ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गत २ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. अनेकवेळा ते पक्ष सोडून जातील अशी आवई उठवली गेली; मात्र ते पक्ष सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठपणा आहे आणि आमचे यश आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) येथील श्री कनक कालीश्‍वर मंदिर प्रशासनाने पाडले !

सरकारीभूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी आणि अन्य अतिक्रमणे पाडण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवत का नाही ? हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्यावर दडपशाही करणारे नास्तिकतावादी तमिळनाडू सरकार हिंदुद्वेषीच होत !

श्रीरामजन्मभूमीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे दिले.

आसामध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केलेत, तर उर्वरित मदरशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालू करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर देशातील अन्य भाजपशासित राज्यांतही असे करायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या फोडण्यात आलेल्या मूर्तींची छायाचित्रे ट्विटरवर प्रसारित केल्याने कोलकाता पोलिसांकडून हिंदु वापरकर्त्याला नोटीस !

बांगलादेशचे सरकार नव्हे, तर बंगालमधील कोलकाता पोलीस याविषयी एका हिंदुला नोटीस देतात, हे संतापजनक ! बंगालमधील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत आहे कि बांगलादेशमध्ये ?

कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याचा उपयोग नाही ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या कायद्याची कार्यवाही न करणारे उत्तरदायी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !

नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या ग्रंथदिंडीला येथील कुसुमाग्रज प्रतिष्‍ठानमधून सकाळी ९.३० वाजता प्रारंभ झाला. या दिंडीमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या गौरवगीतांसमवेत महाराष्‍ट्राचे संस्‍कृतीदर्शन घडवणारे विविध चित्ररथ साकार करण्‍यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले