मुखपट्टीविना फिरणार्‍या ७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर कारवाई

मुखपट्टीविना फिरणार्‍या ७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर मुंबई पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी दंडात्मक कारवाई केली आहे; मात्र तिन्ही रेल्वे मार्गांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली नाही.

सनातन संस्थेवर नव्हे, तर हिंदुद्रोही मंत्र्यांवरच बंदी घाला ! – ह.भ.प. कारभारी साहेबराव अंभोरे महाराज, उपाध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संत आणि शूर यांची भूमी असूनही येथे प्रतिदिन हिंदुविरोधी भूमिका घेतली जाते. हे योग्य नसून हिंदु धर्माची पताका सर्वत्र फडकवणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या मंत्र्यांना आवर घालणे आवश्यक आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार विधानसभेत आक्रमक : कणकवलीत शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण

वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यास उपमुख्यमंत्र्यांची संमती !

स्मारक उभारण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार अशोक पवार, वढूचे माजी सरपंच अनिल शिवले उपस्थित होते.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात ! – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी निर्देशांचे पालन केल्यास मंदिरे बंद करण्याची वेळ येणार नाही; मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तुळजापूर येथे दिली.

वाळपई-फोंडा मार्गाला स्व. दीपाजी राणे यांचे नाव देण्याची देशप्रेमी नागरिकांची मागणी

सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ यांच्या सहकार्याने ‘शहीद स्तंभ’ परिसरामध्ये स्वातंत्र्यसैनिकाना पुष्पचक्र वाहून आदरांजली वहाण्यात आली. या कार्यक्रमात अधिवक्ता शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘सत्तरी तालुक्याचा इतिहास हा प्रत्येकामध्ये अभिमान निर्माण करणारा आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची स्वाक्षरी मोहीम !

राष्ट्रपतींना ७५ सहस्र पत्रे पाठवणार !

गोव्यात ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळला : इंग्लंड येथून आलेला ८ वर्षीय मुलगा बाधित

कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी आढळला आहे. इंग्लंड येथून आलेल्या ८ वर्षीय मुलाला ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

‘सरकार हरवले आहे’, असा संदेश लिहिलेला सदरा घालून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा विधानभवनात प्रवेश !

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जनतेच्या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असतांना सरकार त्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.

इतर मागासवर्गीय समाजाचे राखीव आरक्षण वगळून निवडणुका घेण्यात येऊ नयेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण, विधीमंडळात एकमताने ठराव संमत