देहलीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

गेली ३ दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन आतंकवादाच्या सावटाखालीच भारताला साजरे करावे लागत आहेत, हे अतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील पाकप्रेमी जमात-ए-इस्लामीच्या ४५ ठिकाणांवर धाडी

संघटनेकडून पाकला समर्थन देण्यात येते, तसेच फुटीरतावादी धोरण राबवली जातात. वर्ष २०१९ मध्ये केंद्रशासनाने तिच्यावर बंदी घालूनही ती जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे.

अटकेला आव्हान देणारी राज कुंद्रा यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

कुंद्रा यांच्यासह त्यांच्या आस्थापनाचे ‘आयटी’ प्रमुख रायन थॉर्पे यांचीही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

अफगाण सैन्याच्या कारवाईत ३८५ तालिबानी ठार !

पाक तालिबानला साहाय्य करतो, हे यातून सिद्ध झाल्यामुळे आता पाकला जागतिक समुदायाने ‘आतंकवादी देश’ घोषित करावे !

पाकमधील श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ५० जणांना अटक !

जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी अशा प्रकारची थातूरमातुर कारवाई करण्यात येत आहे. अशांना कठोर शिक्षा झाली, तरच ‘कारवाई झाली’, असे म्हणता येईल !

जमशेदपूर (झारखंड) येथे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

या प्रसंगी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी संमती

अन्य आस्थापनांच्या कोरोना प्रतिबंधक लसींचे २ डोस घ्यावे लागतात. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा मात्र १ डोस घ्यावा लागतो.

विवाहाच्या अंतर्गत बलात्काराला भारतात शिक्षा नाही ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने म्हटले की, विवाहातील जोडीदारांना समान वागणूक दिली पाहिजे. पतीने पत्नीच्या शरिरावर वर्चस्वाचा दावा करू नये.

भारताच्या तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन् यांची ‘रिकॅप’चे कार्यकारी संचालक म्हणून निवड !

आशिया खंडात समुद्रमार्गे वाहतूक करतांना जहाजांवर समुद्री चाचे (समुद्रामध्ये चोरी, तस्करी करणारे) दरोडे घालून ते लुटतात. ते रोखण्याचे दायित्व नटराजन् यांच्यावर असणार आहे.

देहली आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा इ-मेल अल् कायदाच्या एका आतंकवाद्याकडून प्राप्त झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.