राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील पाकप्रेमी जमात-ए-इस्लामीच्या ४५ ठिकाणांवर धाडी

श्रीनगर (जम्मू -काश्मीर) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांना समवेत घेत राज्यातील १४ जिल्ह्यांमधील पाकप्रेमी जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंधित ४५ ठिकाणी धाडी टाकल्या. दोडा, किश्तवाड, रामबन, अनंतनाग, बडगाम, राजौरी, शोपिया येथे धाडी घातल्या.  संघटनेकडून पाकला समर्थन देण्यात येते, तसेच फुटीरतावादी धोरण राबवली जातात. वर्ष २०१९ मध्ये केंद्रशासनाने तिच्यावर बंदी घालूनही ती जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे. (बंदी असूनही संघटना सक्रीय कशी रहाते ? – संपादक)