सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा

जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खनन, सिलिका उत्खनन प्रकल्प, बेसुमार वृक्षतोड आदींना पाठीशी घालणार्‍या भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘अप्पर जिल्हाधिकारी हटवा-पर्यावरण वाचवा’ अशा घोषणा देत मनसेच्या वतीने धडक मोर्चा

१ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला १६ सहस्र लिटर पाणी विनामूल्य पुरवणार ! – दीपक पाऊसकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री

गोव्यात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गोव्यात प्रतिदिन ६ सहस्र लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासते. गोव्यात आतापर्यंत प्रतिदिन ५ सहस्र ३०० लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी पुरवले जात आहे,

वणी खुर्द (चंद्रपूर) गावात २ कुटुंबांतील ७ जणांना दोरीने बांधून मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

जादूटोणा केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी कांबळे आणि हुके या २ कुटुंबांतील ७ लोकांना दोरीने बांधून भर चौकात बेदम मारहाण केली आहे. यामध्ये ४ महिला आणि ३ वृद्ध यांचा समावेश आहे.

यंदा गोव्यात सार्वजनिक गणेशात्सव मंडळांचा सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधी करण्यावर भर

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांनी सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधींवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील निवडणुका स्वबळावरच लढू ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

राज्यातील सरकार किती वेळ चालेल ठाऊक नाही; पण या सरकारमुळे जे दुखावले गेले आहेत, त्यांना आम्ही निश्चित न्याय देऊ…

गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे महाविकास आघाडी सत्तेला चिकटली आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात.

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचा उपचार चालू असतांना मृत्यू !

मानसिक ताण सहन न झाल्याने होणार्‍या आत्महत्यांचे वाढते प्रमाण पहाता आत्महत्या टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, तर ५४ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३२८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ४४२ झाली आहे.

राज्य सरकारकडून दहीहंडीसाठी अनुमती नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदा अनुमती दिली आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, तर उत्सव आणि संस्कृती यांना गालबोट लागेल. आम्ही गोविंदा पथकांवर कसे लक्ष ठेवणार ?

नागपूर येथील ‘गंगा-जमुना वस्ती’त आंदोलक आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की !

‘गंगा-जमुना वस्ती’त अवैध धंदे बंद करण्याच्या पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून समर्थन केले जात आहे, तर ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वाखाली ही वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.