पुढील निवडणुका स्वबळावरच लढू ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई – राज्यातील सरकार किती वेळ चालेल ठाऊक नाही; पण या सरकारमुळे जे दुखावले गेले आहेत, त्यांना आम्ही निश्चित न्याय देऊ. शिवसेना-भाजप एकत्र येतील का ? हा जर-तरचा प्रश्न आहे; पण आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी सरकारच्या विविध भूमिकेविषयी पाटील यांनी टीका केली.