सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३२८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ४४२ झाली आहे. २३ ऑगस्ट या दिवशी ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत १ सहस्र ६७७ रुग्णांवर उपचार चालू आहेत.