कोकणातील गणेशभक्तांसाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे प्रवास आणि १ वेळचे जेवण विनामूल्य

७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता ही रेल्वे दादर (मुंबई) स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सुटणार आहे. १८ डब्यांची (बोगीची) ही रेल्वे दादर ते सावंतवाडी अशी धावणार आहे. या अंतर्गत पूर्ण प्रवास आणि एकवेळचे जेवण प्रवाशांना विनामूल्य देण्यात येणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात असणार्‍या काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना अंबड (जालना) येथे पोलिसांनी घेतले कह्यात !

पोलिसांनी अंबड शहरातील एका उपाहारगृहामधून काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेताच त्यांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

ढोंगी मुसलमानप्रेम !

पृथ्वीवरील ५६ इस्लामी देशांपैकी केवळ पाक आणि कतार या देशांनीच आतापर्यंत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणार्‍या तालिबानला उघडपणे समर्थन दिलेले आहे, तर उर्वरितांपैकी कुणीही उघडपणे तालिबानी सरकारला समर्थन आणि विरोध करण्याविषयी ‘ब्र’ही काढलेला नाही.

संस्कृतचे संवर्धन !

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मूतील कठुआ येथे एका संस्कृत संस्थानच्या भवनाचा शिलान्यास करतांना ‘पालकांनी त्यांच्या पाल्यांना संस्कृत शिकण्यास प्रेरित केले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.

अमरावती येथे गणेशोत्सव मंडळात यंदाही ४ फुटांचीच श्री गणेशमूर्ती असणार !

कोरोनामुळे मूर्तीकारांना आर्थिक झळ !

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पदाधिकार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

हिंदु रक्षा अधिवेशनात भारतमाता की जय संघाच्या वतीने हिंदूरक्षण आणि हिंदूहित यांसाठी महत्त्वाचे ४ कृतीसंकल्प घोषित !

गोव्यातील संघकामाची षष्ट्यब्दि आणि प.पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या रा.स्व. संघाची स्थापनाशताब्दी या २ संघपर्वण्या साधून, यामधल्या कालावधीत राज्यात १०० प्रभावी दैनंदिन शाखा निर्माण करण्यात आल्या.

संभाजीनगर येथे ४१८ ठिकाणांवर ७०० ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’ची दृष्टी रहाणार ! 

‘कॅमेर्‍या’चे चित्रण (फूटेज) पहाण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘कमांड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातही ‘कॅमेर्‍या’चे चित्रण त्यांना पहाता येणार आहे.

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे प्रशासन !

दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार ‘मागवलेले आणि प्रत्यक्षात पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यांमध्ये पुष्कळ तफावत आहे’, असे लक्षात आले.

तुर्कस्तानचे ढोंगी मुसलमानप्रेम जाणा !

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे लक्षावधी अफगाणी नागरिक पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.