मथुरा (उत्तरप्रदेश) येथील शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन सादर !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही देशाची सर्वपक्षीय सरकारे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखू शकत नसतील, तर ती आतंकवाद, नक्षलवाद, घुसखोरी, परकीय आक्रमणे यांपासून राष्ट्राचे रक्षण कसे करतील ? याचा विचार करा !

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा चालू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

(म्हणे) ‘ज्योतिषशास्त्राला कारण आणि परिणाम सिद्ध करता येत नाहीत !’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिषविरोधी प्रबोधन मोहिमेच्या कार्यक्रमात ज्योतिषशास्त्रावर टीका !

मोठ्या आस्थापनांकडून अल्प दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक !

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट, मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने न्यून दर्जाचे आढळले, ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या मोठ्या आस्थापनांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

मराठा आरक्षणासाठी पुढील मूक आंदोलन नांदेड येथे होणार ! – संभाजीराजे, भाजप खासदार

मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या विलंबाविषयी खेद व्यक्त करत पुन्हा एकदा लढा चालू करण्याची चेतावणी दिली आहे.

घाटकोपर (मुंबई) येथे राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर दुकानदारांनी थांबवली !

राष्ट्रध्वजाच्या अवमानाकडे प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष !

पुणे जिल्ह्यातील उपसा सिंचन विभागातील उपअभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

मंत्रालयात आढळल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्‍या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच !

जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे यांचे निधन !

पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला

आजपासून लोकल प्रवासासाठी रेल्वेस्थानकांवर ‘ऑफलाईन’ पास उपलब्ध !

मुंबईत लोकलमधून प्रवास करता येण्यासाठी लागणारा पास देण्याची ‘ऑफलाईन’ प्रकिया ११ ऑगस्टपासून चालू करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.