मोठ्या आस्थापनांकडून अल्प दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक !

  • अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट 

  • मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने न्यून दर्जाचे आढळले

  • ३ सहस्र ४८० किलो जप्त केलेल्या मधाचे मूल्य ३६ लाख १९ सहस्र ३१९ रुपये

ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या मोठ्या आस्थापनांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – अनेक मोठ्या आस्थापनांकडून अल्प दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे, हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या  ( एफडीए ) कारवाईतून समोर आले आहे. प्रशासनाने विशेष मोहीम राबवत राज्यभरातून घेतलेल्या मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने न्यून दर्जाचे असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. यात पतंजली, डाबर, झंडू, बैद्यनाथ, सफोला, उत्तराखंड हनी यांसह अनेक मोठ्या आस्थापनांच्या मधाचा समावेश आहे. या आस्थापनांच्या मधात साखरेचे प्रमाण आढळले असून या आस्थापनांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे अन्न-औषध प्रशासनाने म्हटले आहे. या कारवाईत ३ सहस्र ४८० किलो मध जप्त केला असून त्याचे मूल्य ३६ लाख १९ सहस्र ३१९ रुपये इतके आहे.