‘समाजात काही गुरूंचे २ किंवा ३ शिष्य संत बनतात; परंतु सनातनमध्ये ११३ संत कसे ?’ या प्रश्नाचे उत्तर

बहुतेक संत समाजातील लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यावर भर देतात. त्यातून त्यांचे अनेक भक्त सिद्ध होतात. त्यातील अगदीच काही भक्त त्यांनी सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात…

धन्य ते परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धन्य ते त्यांचे ‘साधकरूपी धन’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुप्राप्तीनंतर गुरुचरणी तन, मन आणि धन, म्हणजे सर्वस्वच समर्पित केले. त्यांच्याकडे शिल्लक राहिले ते केवळ ‘साधकरूपी धन’ !…

धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करा !

जसे रामरायाच्या कार्यात सहभागी होऊन वानरसेनेने स्वतःचा उद्धार करून घेतला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करून घ्या !

विविध शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर दिसलेली शुभचिन्हे !

साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीमध्ये होणार्‍या दैवी पालटांमुळेही तिच्या देहावर शुभचिन्हे उमटतात. विविध यज्ञ-याग, धार्मिक विधी आणि सोहळे यांच्या प्रसंगी सनातनच्या श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर अनेक दैवी शुभचिन्हे दिसून आली.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय – संत घडवणारे एक विश्वविद्यालय !

भारतातील काही गुरुकुलांविषयी माहिती वाचनात आली. त्यात सांगितलेली त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे तेथे १४ विद्या आणि ६४ कला यांतील अनेक विद्या अन् कला शिकवल्या जातात….

७९ व्या वर्षीही त्वचेवर विशेष सुरकुत्या नसणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी वैशिष्ट्य !

गेल्या २ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून त्यांच्या विविध छायाचित्रांचा अभ्यास करवून घेतला. या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताने उलगडलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील दैवी लीला आम्हाला अनुभवता आली.

सप्तर्षींनी वर्णिलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारकार्याची लीला

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्यक्ष महर्षींनी उलगडून सांगितलेले एक प्रकारचे अवतारचरित्रच आहे. परात्पर गुरु डॉक्टर म्हणायचे, ‘माझे चरित्र कोण लिहिणार ?’ त्यांचे अवतारचरित्र महर्षीच लिहू शकतात

आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्यासाठी शिष्य बना !

या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.

gurupournima

आपत्कालीन स्थितीत (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर) धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत !

गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस गुरूंच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गुरूंच्या लीलांचे स्मरण करणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अधिकाधिक जप करणे आदि करू शकतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच त्यांचे कार्य यांच्याविषयी सप्तर्षींनी काढलेले गौरवोद्गार !

पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर वाफेत होऊन पाऊस पडतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शक्तीचे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीत रूपांतर होते आणि ती शक्ती कार्य करते.