‘समाजात काही गुरूंचे २ किंवा ३ शिष्य संत बनतात; परंतु सनातनमध्ये ११३ संत कसे ?’ या प्रश्नाचे उत्तर

‘वरील प्रश्न काही जणांना पडतो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

बहुतेक संत समाजातील लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यावर भर देतात. त्यातून त्यांचे अनेक भक्त सिद्ध होतात. त्यातील अगदीच काही भक्त त्यांनी सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनही २ – ३ जणच त्यांनी सांगितलेली साधना करून ‘शिष्य’ या पदाला पोचतात आणि पुढे त्यांनाच ‘संत’ म्हटले जाते. त्यामुळे बहुतेक संप्रदायांमध्ये ‘संत’ घडण्याची प्रक्रिया फार अल्प प्रमाणात असते.

याउलट सनातनमध्ये व्यावहारिक अडचणींसाठी कधीच मार्गदर्शन केले जात नाही. सर्वांना प्रारंभापासूनच व्यष्टी आणि समष्टी साधनेची शिकवण दिली जाते. त्यातून प्रत्येक साधक आध्यात्मिक स्तरावर कृतीशील होतो. त्याचाच परिणाम म्हणून १५ जुलै २०२१ पर्यंत सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या सहस्रो साधकांपैकी १३८१ हून अधिक साधक ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे असून ते संत बनण्याच्या मार्गावर आहेत, तर आतापर्यंत ११३ साधक संत झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले