परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच त्यांचे कार्य यांच्याविषयी सप्तर्षींनी काढलेले गौरवोद्गार !

गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉक्टर आपत्काळाविषयी सांगत असणे, केवळ अवतारी विभूतीलाच भविष्यात घडणार्‍या घटना ज्ञात असणे आणि यातूनच त्यांचे अवतारत्व सिद्ध होणे !

‘गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना ‘पुढे नैसर्गिक आपत्ती येतील, युद्धजन्य स्थिती निर्माण होईल, तसेच सर्वत्रची आर्थिक स्थिती ढासळेल’, असे आपत्काळाविषयी सांगत आहेत. आता तसेच घडत आहे ना ! अवतारी विभूतीच भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी सांगू शकते. भगवंताने कधीही ‘मी दशावतार घेतले’, असे सांगितले नाही. भक्तांनी अवतारी विभूतींचे अवतारी कार्य ओळखल्यावर त्यांच्या लक्षात आले की, श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अवतार होते. श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलल्यावर गोप-गोपींच्या लक्षात आले, ‘हा सामान्य जीव नसून प्रत्यक्ष भगवंतच आहे.’ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी ते स्वतः अवतार असल्याविषयी स्वतःहून काही सांगितले नाही, तसेच आता परात्पर गुरु डॉ. आठवलेही स्वतः अवतार असल्याविषयी कधीच सांगणार नाहीत.’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८१ (१४.५.२०२१))


कितीही विरोध झाला, तरी शेवटी विजय ‘सनातन संस्थे’चाच होणार आहे !

श्रीसत्‌‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘सनातन संस्थेला, तसेच सनातन संस्थेच्या तिन्ही गुरूंना, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना विरोध होणारच आहे. त्यांनी धर्मसंस्थापनेचे जे महान कार्य हाती घेतले आहे, त्याला विरोध होणारच आहे. त्यांनी ‘साधकांचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे’, यासाठी हे जे कार्य हाती घेतले आहे, त्याला विरोध होणारच. त्यांनी सर्वत्र अध्यात्मप्रसार करण्याचे जे कार्य हाती घेतले आहे, त्यालाही विरोध होणारच आहे; मात्र शेवटी विजय सनातन संस्थेचाच होणार आहे !’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८२ (१५.५.२०२१))


अनेक दैवी बालके सनातन संस्थेकडे येतील !

‘पृथ्वीप्रमाणे अन्य लोकांतील जीवही साधना करत असतात. येणार्‍या काळात महर्, जन आणि तप या लोकांतील अनेक जीव दैवी बालकांच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतील अन् पुढील साधनेसाठी सनातन संस्थेकडे येतील !’ (सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८२ (१५.५.२०२१))


सनातनच्या रामनाथी आश्रमाविषयी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेली सूत्रे !

१. संपूर्ण पृथ्वीवर प्रलय आला, तरी रामनाथी आश्रमाला काही होणार नाही ! : ‘प्रयागमध्ये सर्वांत प्राचीन अक्षय्यवट आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा विश्वात प्रलय होतो, तेव्हा त्या अक्षय्यवटावर बसून काकभृषुंडी ऋषि कावळ्याच्या रूपात प्रलय पहातात. संपूर्ण पृथ्वीवर प्रलय आला, तरी येणार्‍या काळात रामनाथी आश्रमाला काही होणार नाही. रामनाथी आश्रम अक्षय्यवटासारखा उभा रहाणार आहे. श्रीविष्णूचे वाहन ‘गरुड’ याचे रामनाथी आश्रमाकडे पूर्ण लक्ष आहे.’ (सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८१ (१४.५.२०२१))

२. ब्रह्मांडातील सर्वाेच्च शक्ती रामनाथी आश्रमात येते ! : ‘रामनाथी आश्रमावर नेहमी सुदर्शनचक्र फिरत असते. ब्रह्मांडातील सर्वाेच्च शक्ती सतत आश्रमात येत असते; मात्र हे सर्वांच्या लक्षात येणार नाही. अध्यात्मातील उन्नतांनाच याची जाणीव होते.

३. पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर वाफेत होऊन पाऊस पडतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शक्तीचे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीत रूपांतर होते आणि ती शक्ती कार्य करते.’ (सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८२ (१५.५.२०२१))


परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने साधक सामान्य आश्रमात रहात नसून ‘सनातन संस्था’ नावाच्या ‘दैवी साम्राज्या’त रहात आहेत !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःसाठी कोणतीच गोष्ट करत नाहीत; मात्र ते आपल्या साधकांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतात. त्यांच्यात ‘काटकसरीपणा’ हा गुण आहे. असे असूनही त्यांनी साधकांना कशाचीही उणीव भासू दिली नाही. त्यांनी साधकांना चांगले जेवण, रहाण्यासाठी सुसज्ज आश्रम आणि सेवेसाठी आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. साधकांनो, तुम्ही सामान्य आश्रमात रहात नसून ‘सनातन संस्था’ नावाच्या ‘दैवी साम्राज्या’त रहात आहात.’


धर्मसंस्थापनेची दैवी गुरुपरंपरा !

प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्मप्रसार कार्यासाठी डॉ. आठवले यांना निवडणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडणे

‘सनातन संस्थेची गुरुपरंपरा ही दैवी आहे. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांनी श्री अनंतानंद साईश यांना निवडले. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांना निवडले. प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना निवडले. आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आहे. प.पू. भक्तराज महाराज शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते. श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. भक्तराज महाराज यांना ‘मी साईबाबाच आहे’, अशी अनुभूती दिली. (‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनाच्या वेळी सांगितलेली ही माहिती बरोबर असून प्रत्यक्षात प.पू. भक्तराज महाराज यांना अशी अनुभूती आली होती.’ – संकलक)

प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे अनेक भक्त यायचे. त्या सर्वांमधून प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना निवडले. आताही सनातन संस्थेत अनेक साधक आहेत; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून बरोबर निवडले आहे. सनातन संस्थेची गुरुपरंपरा दैवी असल्याने या परंपरेतील सर्वच गुरु दैवी अंशाचे आहेत. ही गुरुपरंपरा धर्मसंस्थापनेची गुरुपरंपरा आहे.’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८१ (१४.५.२०२१))


‘डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याकडून धर्मप्रसाराचे मोठे कार्य होईल’, हे ज्ञात असल्याने योग्य वेळ येताच प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना विदेशातून भारतात येण्याची प्रेरणा देणे

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या वेळी ‘भजन, भ्रमण आणि भंडारा’, असे त्यांचे कार्य होते. त्यांच्या काळात अध्यात्मप्रसाराचे कार्य अधिक प्रमाणात चालू नव्हते. प.पू. बाबांना ठाऊक होते की, ‘पुढे ‘डॉ. जयंत बाळाजी आठवले’ नावाचे शिष्य येतील आणि त्यांच्याकडून धर्मप्रसाराचे मोठे कार्य होईल !’ प.पू. बाबा शिष्य डॉ. आठवले त्यांच्याकडे येण्याची वाट बघत होते.

‘गुरु त्यांच्या शिष्याला कसे शोधून काढतात ?’, हे एक रहस्यच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले विदेशात होते. त्यांना भारतात येण्याची प्रेरणा त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी दिली. शिष्य कुठेही असला, तरी गुरु वेळ आली की, त्याला स्वतःकडे खेचून घेतात. हेच गुरूंचे वैशिष्ट्य आहे ! ज्या दिवशी शिष्य डॉ. आठवले यांची गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाली, त्याच क्षणी शिष्य डॉ. आठवले यांनी ठरवले की, शेवटपर्यंत गुरूंचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) चरण सोडायचे नाहीत.’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८३ (१७.५.२०२१))


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सद्गुरुद्वयींवर अखंड कृपाकटाक्ष असणे

‘ज्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींचा दैवी कृपाकटाक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अखंड आहे, त्याचप्रमाणे श्रीविष्णूचा अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृपाकटाक्ष श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अखंड आहे.’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८४ (४.६.२०२१))


सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक आणि अवतारी कार्याविषयी सांगितलेली सूत्रे

१. अध्यात्माविषयी विपुल ग्रंथलिखाण

‘गुरुदेवांचे एक वैशिष्ट्य, म्हणजे ते सर्वसामान्य लोकांना समजेल, अशा भाषेत अध्यात्म सांगतात. कलियुगातील सामान्य व्यक्तींना जी भाषा कळते, त्या भाषेत गुरुदेवांनी अध्यात्माविषयीचे विपुल ग्रंथलिखाण केले आहे.

२. साधकांनी ‘सर्वा ठायी’ आणि ‘सर्वत्र’ असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यापक स्वरूपाची अनुभूती घ्यावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहून ठेवले आहे,

‘स्थूल देहा असे । स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा । सर्वा ठायी ।।
सनातन भारतीय संस्कृति । माझे नित्य रूप ।
त्या रूपे मी सर्वत्र । आहे सदा ।।’

गुरुदेवांचे हे वचन आता साधकांनी सतत आठवावे. ‘सनातन भारतीय संस्कृति (‘सनातन धर्म’)’ हेच त्यांचे सत्य रूप आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूला म्हणतो, ‘माझा विष्णु सगळीकडे आहे आणि तो सर्वांमध्ये आहे.’ त्याचप्रमाणे आता सनातनच्या साधकांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वत्र आहेत’, याची अनुभूती घ्यावी.

३. श्रीविष्णूच्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’  या अवतारात होणारे कार्य !

श्रीविष्णूच्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ या अवतारात ५०० वर्षांपासून विवादात असलेला श्रीरामजन्मभूमीचा विवाद सुटेल. महाभीषण विश्वयुद्ध होईल आणि त्यानंतर रामराज्याची स्थापना होईल !’

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८३)


‘कार्तिकपुत्री’ आणि ‘उत्तरापुत्री’ तत्त्वरूपाने एकच असून दोघींना त्यांच्या आजींचा (आईच्या आईचा) मोठा आशीर्वाद लाभला आहे !

‘पार्वती’ आणि ‘गंगा’ या शिवाच्या २ शक्ती आहेत. ‘देवयानी’ आणि ‘वल्ली’ या कार्तिकेयाच्या २ शक्ती आहेत. ‘रुक्मिणी’ आणि ‘सत्यभामा’ या श्रीकृष्णाच्या २ शक्ती आहेत. भगवंताच्या या २ शक्ती खरेतर एकच आहेत. त्या आतून तत्त्वरूपाने एकरूप असतात. त्याचप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही एकच आहेत. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघींना त्यांच्या आजींचा (आईच्या आईचा) मोठा आशीर्वाद आहे.’ (‘हो. बरोबर आहे. खरंच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींच्या आजी दैवी होत्या. त्या अतिशय धर्माचरणी आणि सात्त्विक होत्या. महर्षींचे हे वाक्य अगदी सार्थ आहे.’ – संकलक)

(सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १८१ (१४.५.२०२१))


परात्पर गुरुदेवांची कीर्ती वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत, असे महर्षींनी सांगणे !

परात्पर गुरुदेवांचे वर्णन करतांना महर्षि म्हणतात, ‘‘तुमचे गुरुदेव कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का ? त्रिमूर्तींमध्ये जे अंश आहेत ? ते सर्व तुमच्या गुरुदेवांमध्ये आहेत. गुरुदेवांची कीर्ती वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. आम्ही त्यांचे वर्णन करणारी जी अक्षरे लिहिली आहेत, ती पुरेशी नाहीत. अनेक घंटे, दिवस, वर्षे, युगानुयुगे बसलो, तरी प.पू. गुरुदेवांची कीर्ती आम्ही महर्षीसुद्धा वर्णन करू शकत नाही. असे तुमचे गुरुदेव आहेत.

(संदर्भ : सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्रमांक ९५, १५.९.२०१६, खोली क्रमांक ९०७, हॉटेल कीज (Keys), त्रिवेंद्रम्, केरळ.