धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करा !

गुरुपौर्णिमेनिमित्त  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा संदेश

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

पृथ्वीवर अधर्म माजल्यावर ईश्वर अवतार घेतो आणि भक्तांचे रक्षण करतो. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही) असे भगवान श्रीकृष्णाने भक्तांना वचन दिले आहे. श्रीराम-श्रीकृष्ण आदी अवतारांनी अनेक लीला करून भक्तांचे रक्षण केले. प्रभु श्रीरामचंद्रांनी समस्त जिवांचे कल्याण करणारे रामराज्य स्थापले. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट कौरवांचा पराभव करून धर्मराज्य स्थापले. कलियुगातही धर्मसंस्थापनेचे महान कार्य श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभले आहे. जसे रामरायाच्या कार्यात सहभागी होऊन वानरसेनेने स्वतःचा उद्धार करून घेतला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या दैवी कार्यात सहभागी होऊन जीवनाचे सार्थक करून घ्या !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२१)