‘भारतातील काही गुरुकुलांविषयी माहिती वाचनात आली. त्यात सांगितलेली त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे तेथे १४ विद्या आणि ६४ कला यांतील अनेक विद्या अन् कला शिकवल्या जातात. या गुरुकुलातील विद्यार्थी विविध विषयांत पारंगत होऊन आणि पदवी घेऊन बाहेर पडतात. हे कौतुकास्पद आहे; परंतु यामध्ये एकच कमतरता रहाते आणि ती म्हणजे, तेथे साधना शिकवली जात नाही. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातही अशा प्रकारे विविध विद्या आणि कला यांचे शिक्षण दिले जाईल; पण त्याचा मूळ पाया हा साधना असेल. अनेक विद्या आणि कला यांचे शिक्षण त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी पूरक असेच असेल. त्यामुळे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातून बाहेर पडणारे काही विद्यार्थी संत बनूनच बाहेर पडतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले