धर्मसंस्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करा !

धर्मनिष्ठ हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता करा आणि असा त्याग केल्याने गुरुतत्त्वाला अपेक्षित आध्यात्मिक उन्नती होईल, याचीही निश्चिती बाळगा !

गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती

शिष्याची गुरूंविषयी भक्ती दृढ करणारी सनातनची ग्रंथमालिका !

गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

२३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया !

हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर क्षात्रतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत, तर संत आणि सनातन संस्थेसारख्या अन्य संघटना ब्राह्मतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत.

धर्माचे महत्त्व !

धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे खालील छायाचित्र पाहून त्यांचे वय किती जाणवते ?’, ते कळवा !

या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्वचा, डोळे आणि तोंडवळ्यावरील भाव पहा. यांतून ‘त्यांचे वय किंवा अन्य काही गोष्टी यांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा.

ईश्वराप्रमाणे सर्व कार्य करून स्वतः नामानिराळे रहाणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाविषयी काढलेले कौतुकोद्गार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक काढण्यात आले. ९.५.२०२१ या दिवशी ‘सनातनची दैवी गुरुपरंपरा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला…..

सनातनचे तीन गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे सूक्ष्मातील अलौकिक, विश्वव्यापक अन् बुद्धीअगम्य कार्य !

‘सर्वत्रच्या साधकांना तीन गुरूंच्या सूक्ष्मातील अगाध कार्याची थोडी तरी कल्पना यावी’, यासाठी काही सूत्रे येथे मांडली आहेत.