विविध शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर दिसलेली शुभचिन्हे !

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अलौकिकत्व स्पष्ट करणार्‍या दैवी घटना !

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्वरेच्छेने अस्तित्वाद्वारे कार्य करून ईश्वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीमध्ये होणार्‍या दैवी पालटांमुळेही तिच्या देहावर शुभचिन्हे उमटतात. विविध यज्ञ-याग, धार्मिक विधी आणि सोहळे यांच्या प्रसंगी सनातनच्या श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर अनेक दैवी शुभचिन्हे दिसून आली. या शुभचिन्हांच्या माध्यमातून ईश्वराने श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दिव्यत्व अन् अद्वितीयत्व यांची प्रचीती समष्टीला दिली आहे.

नमस्काराच्या मुद्रेतील हातांची रचना कमळाच्या कळीप्रमाणे होणे

८.५.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या षोडषोपचार  पूजनांतर्गत देवीचे आवाहन केले जात असतांना श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर कमळाची आकृती उमटल्याचे लक्षात आले. कमळ हे लक्ष्मीतत्त्वाचे प्रतीक आहे. पूजन करतांना श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाल्याने त्यांच्या कपाळावर कमळाची आकृती दिसून आली.

श्री ललिता त्रिपुरसुंदरीदेवीसाठी लक्षकुंकूमार्चन विधी करतांना आज्ञाचक्रावर कमळाची आकृती दिसणे

विविध यज्ञ, पूजा विधी आणि धार्मिक सोहळे आदी प्रसंगी ब्रह्मरंध्रावर प्रकाश दिसणे

विविध धार्मिक विधींच्या वेळी काढलेल्या छायाचित्रांमध्ये श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, म्हणजे डोक्याच्या वर मध्यभागी एक तेज:पुंज प्रकाश दिसला. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदाताई यांच्यात तेजतत्त्व अधिक असल्याने त्यांच्या ब्रह्मरंध्रातून समष्टीसाठी अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणारे निर्गुण तत्त्व श्वेत प्रकाशाच्या रूपात त्यांच्या डोक्याच्या वरच्या ठिकाणी दिसून येते. या अनुभूतीतून समष्टी संतांकडून सूक्ष्म स्तरावर सतत होत असलेल्या कार्याची प्रचीती मिळते.


यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी चरणांतून दैवी द्रव येणे

चरणांतून निघालेले दैवी द्रव

२५.३.२०१९ या दिवशी ५४ वा, तर ३१.३.२०१९ या दिवशी ५५ वा पंचमुखी हनुमत्कवच याग आणि ७.४.२०१९ या दिवशी सौरयाग आदी आश्रमात करण्यात आले. या तिन्ही यज्ञांच्या पूर्णाहुतीच्या वेळी सद्गुरु बिंदाताई यांच्या चरणांतून पाण्यासारखे द्रव वाढीव प्रमाणात बाहेर पडले. त्या द्रवाची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. सौरयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदाताई यांच्या उजव्या चरणातून निघालेल्या दैवी द्रवाच्या सकारात्मक उर्जेची प्रभावळ १६५.८४ मीटर, तर डाव्या चरणातून निघालेल्या दैवी द्रावाच्या सकारात्मक उर्जेची प्रभावळ १०७.७६ मीटर होती. या द्रवाचे नमुने मुंबईतील ‘आय.आय.टी.’ या प्रख्यात आस्थापनाच्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणीसाठी पाठवले असता, त्यातील क्षारांचे प्रमाण सामान्य व्यक्तींच्या तुलनेत १/१० एवढे अल्प होते. यावरून तो द्रव ‘घाम’ नसून ‘दैवी’ असल्याचे स्पष्ट होते.

श्री आद्य शंकराचार्य यांनी स्वत: स्थापन केलेल्या ४ पिठांपैकी बद्रीनाथ मठाच्या अंतर्गत येणारा आनंदसंप्रदाय त्यांनी त्यांचे शिष्य तोटकाचार्य यांना सोपवला होता. याच परंपरेतील श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद हे महातपस्वी सिद्धपुरुष होते. प.पू. अनंतानंद साईश हे त्यांचेच शिष्य होते. प.पू. अनंतानंद साईश सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू.भक्तराज महाराज यांचे गुरु ! प.पू. भक्तराज महाराज यांच्या देहत्यागानंतर प.पू. रामानंद महाराज त्यांच्या गादीवर बसले. प.पू. भक्तराज महाराजांचे शिष्योत्तम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले ! आता परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांना मोक्षाची वाट दाखवण्याचे कार्य त्यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या करत आहेत.