संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी आणि छायाचित्रणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल, तसेच ऑक्सिजन ऑडिट करावे !

रुग्णालयातील आगीच्या वाढत्या दुर्घटना पहाता शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल, तसेच ऑक्सिजन ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस किशोर बळीराम पाटील यांनी …

अमरावती येथे प्रिस्क्रिप्शन दाखवून विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जा !

‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’चा उपक्रम, बजरंग दलाकडून सिलिंडरची घरपोच सेवा चालू !

राज्यात आढळली २५ सहस्र शाळाबाह्य बालके !

राज्यातील मोठे ५ विभाग वगळता सहस्रो बालके शाळाबाह्य असणे गंभीर आहे. अशीच स्थिती राहिली तर देश विकासाच्या दिशेने कसा जाणार ? यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्यक आहे.

नागपूर येथील स्वतःचा ऑक्सिजन बेड अन्य रुग्णाला देणारे संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नारायण दाभाडकर यांनी स्वतःच्या कृतीतून एकप्रकारे दातृत्वाचा आदर्शच घालून दिला आहे. कोरोनाच्या संकटकाळी समाजातील लोकांनी दाभाडकर यांच्या शिकवणीतून योग्य तो बोध घेऊन आचरण करावे, ही अपेक्षा !

यथार्थ शिक्षणाचा मार्ग हिंदु संस्कृतीतच !

एकीकडे भरमसाठ पैसे घेऊनही सक्षम शिक्षणप्रणाली न उभारू शकणाऱ्या शाळा, महाविद्यालये आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन नव्हे, तर विद्यार्थ्यांना पैसे देऊन आदर्श व्यक्ती घडवणारी गुरुकुल परंपरा आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्वेषणासाठी मुंबई येथे येण्यास पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा नकार !

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे अन्वेषणासाठी येण्यास नकार दिला आहे. ‘अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांनी ई मेलद्वारे प्रश्‍न पाठवल्यास त्यांची ई मेलवरून उत्तरे देईन’, असे उत्तर शुक्ला यांनी पाठवले आहे.

अकोला येथे परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्यान्वये गुन्हे नोंद

‘परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घेत होते. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी बी.आर्. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना होती.

लसीअभावी किमान ३ दिवस मुंबईतील कोरोनावरील लसीकरण बंद राहील ! – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे; मात्र अनेक ठिकाणी लसीचा पुरवठा अपुरा आहे. मुंबईतही लसीअभावी पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी २९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई येथील उच्चपदस्थ शहा यांनी स्वीकारले जैन मुनीत्व !

बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.