मुंबई – राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे; मात्र अनेक ठिकाणी लसीचा पुरवठा अपुरा आहे. मुंबईतही लसीअभावी पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी २९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सुरेश काकाणी म्हणाले, ‘‘मुंबईसाठी ७६ सहस्र डोस मिळाले आहेत. त्यांपैकी ५० सहस्र डोस २९ एप्रिल या दिवशी दुपारपर्यंत संपले. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. ३० एप्रिल या दिवशी साठा मिळण्याची शक्यता अल्प आहे. केंद्रशासनाकडून विशेष गोष्ट म्हणून साठा उपलब्ध करून दिला, तरच लसीकरण करता येईल.’’