|

ठाणे, २९ एप्रिल (वार्ता.) – रुग्णालयातील आगीच्या वाढत्या दुर्घटना पहाता शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल, तसेच ऑक्सिजन ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस किशोर बळीराम पाटील यांनी केली होती. याविषयीच्या बातम्या अन्य दैनिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. याची नोंद घेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा, स्ट्रक्चरल, तसेच ऑक्सिजन ऑडिट पडताळण्याचे निर्देश पारित केले आहेत, असे संपादक किशोर पाटील यांनी कळवले आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !