- रिलायन्स इंडस्ट्रिजची मोठ्या वेतनाची नोकरी सोडली !
- उच्चशिक्षित समाज शहा कुटुंबियांकडून काही बोध घेईल का ?
मुंबई – बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. श्री. प्रकाश शहा हे जामनगरच्या ‘रिलायन्स प्लांट’चे उपाध्यक्ष होते. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नीनेही हा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या मुलाने यापूर्वीच जैन धर्माचे मुनीत्व स्वीकारले आहे. (सध्याच्या भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – संपादक) जेव्हा शहा यांच्या मुलाने दीक्षा घेतली, तेव्हा त्याचे वय अवघे २४ वर्षे होते. शहा कुटुंब हे बोरिवली येथील गीतांजली नगरमधील परवाना इमारतीत रहात होते, अशी माहिती नगरसेविका बिना परेश दोशी यांनी दिली.