पुणे विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील गोंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करावे !

महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांना  तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तहसीलदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

सहस्रावधी रुपये अनोळखी व्यक्तींच्या हाती सोपवून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका ! स्वतः सतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक !

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका !

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी केले आहे. जर चुकूनही कोड स्कॅन केला, तर बँक खात्यामधील पैसे जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.

पुणे येथील पूजनीय स्वामी माधवानंद यांना देवाज्ञा

याविषयी स्वरूपयोग प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त मंडळाने दिलेल्या संदेशात ‘स्वामी माधवानंद यांच्या चैतन्यमय अस्तित्वातून ते आपल्याला सदैव मार्गदर्शन करत रहातील, यावर नितांत श्रद्धा ठेवून आपण साधनेत निरंतर तत्पर राहूया !’, असे भक्तगणांना कळवण्यात आले आहे.

१ मे नंतर होणाऱ्या प्रत्येक मृत्यूस राज्य सरकार उत्तरदायी ! – डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार, भाजप

आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने लस घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला तातडीने विनामूल्य लस द्यावी.

पुण्यातून अडीच लाख उत्तर भारतीय रवाना

कोरोनामुळे राज्यात १ एप्रिलपासून अनेक निर्बंध लागू केले. दळणवळण बंदी केली. त्यामुळे उत्तर भारतीय लोक त्यांच्या मूळ गावी रेल्वेने मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत.

वंशसंहार : आर्मेनियन्सचा आणि हिंदूंचा !

ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.

उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलींद चवंडके यांना ‘दर्पण’ पुरस्कार !

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार घोषित ! फलटण – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या २८ व्या वर्ष २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केली. यातील सन्मानाचा ज्येष्ठ पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई येथील … Read more

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना नागपूर येथे अटक !

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख होता. दीपाली यांचा वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर याविषयी त्यांनी रेड्डी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या; मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला होता.