सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकार्‍यांना कोरोना व्यवस्थापन कार्यात घ्यावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यशासनाला केली आहे.

हे सरकारला लज्जास्पद !

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची राज्यशासनाने दिलेल्या चौकशीच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयात याचिका

परमबीर सिंह यांनी या याचिकेत म्हटले आहे की, १९ एप्रिल या दिवशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या भेटीत त्यांनी ‘अनिल देशमुख यांच्या विरोधातील पत्र मागे घ्या, जेणेकरून त्यांच्या विरोधातील खटल्याला महत्त्व उरणार नाही. तुम्ही संपूर्ण व्यवस्थेशी लढू शकणार नाही.

आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.

चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या ९० जणांवर नवी मुंबई पोलिसांची दंडात्मक कारवाई !

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या ९० जणांवर कामोठे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करूनही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍या, तसेच क्रिकेट, व्हॉलिबॉलसारखे खेळ खेळणार्‍यांवर नवी मुंबई पोलीस पथकाकडून कारवाई केली जात आहे.

लस आल्यानंतर प्रसार माध्यमांद्वारे कळवू, आरोग्य केंद्रांवर गर्दी करू नये !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची मोहीम गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पद्धतीने पालिकेने सर्व केंद्रांवर नियोजन केले आहेे; मात्र सध्या कोरोनाची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना कळवण्यात येईल.

येळंबघाट (जिल्हा बीड) येथे कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले.

रेमडेसिविर इंजेक्शन चोरणार्‍या अफरोज खान याने मृताचे ३६ सहस्र रुपये लाटल्याचा पोलिसांना संशय !

१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता.