ट्रक मालकाच्या अपघाती मृत्यूविषयी १ कोटी १५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा सातारा न्यायालयाचा आदेश !

सातारा जिल्हा न्यायालय

सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – वर्ष २००८ मध्ये ट्रक मालक संजय पवार हे स्वत: ट्रक चालवत होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकचे चाक फुटून समोरा-समोर धडक होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला. याची हानीभरपाई मिळावी यासाठी पवार कुटुंबियांनी सातारा न्यायालयात क्लेम केला होता. याविषयी सातारा जिल्हा न्यायालयाने निकाल देऊन ट्रक मालक आणि विमा आस्थापना यांच्याकडून हानीभरपाई म्हणून ८१ लाख रुपये आणि आतापर्यंतचे ७ टक्के दराने झालेले व्याज, अशी एकूण १ कोटी १५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.