|
लातूर – येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील केवळ कोरोना रुग्णांसाठी असलेल्या कक्षात २० एप्रिलच्या रात्री वीज गेली, तसेच तेथे असलेले जनरेटर चालू झाले नाही. त्यामुळे रुग्णालयातील अतीदक्षता विभागात व्हेन्टिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
त्यामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रुग्णांना तातडीने संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत चालू असलेल्या सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याला संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.