पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – शहरातील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय, तसेच पंढरपूर तालुका (कराड नाका), ग्रामीण पोलीस ठाणे (उजनी वसाहत) आणि मंदिर समितीचे पोलीस कार्यालय या ठिकाणी सप्ताहातील २ वेळा संपूर्ण सॅनिटाझेशन करून देण्याचे दायित्व येथील ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वीकारण्यात आले आहे.
याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुढील कृती करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे विजय तेंडुलकर यांनी सांगितले. या वेळी तालुका अध्यक्ष अमोल कुलकर्णी, महिला प्रमुख अमृता बडवे, शहराध्यक्ष महेश काळे, महिला व्यवसाय आघाडीच्या धनश्री उत्पात, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. या भेटीच्या वेळी पोलीस कर्मचार्यांना एन् ९५, निवडक मास्क आणि फेसशील्डचे वाटप करण्यात आले.