गुरुदेव तपोवन, टाकळी (जिल्हा सांगली) येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे विनामूल्य वाटप !

गुरुदेव तपोवन टाकळी येथे औषध वाटप करतांना श्री. नितीन चौगुले (डावीकडून दुसरे) आणि पू. शिवदेव स्वामीजी (डावीकडून चौथे)

मिरज, २३ एप्रिल – श्री सिद्धगिरी कणेरी मठाच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या औषधांचे वाटप वेदांत केसरी मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी येथे प्रतिदिन सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात येत आहे. याचे उद्घाटन पू. शिवदेव स्वामीजी, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले, बोलवाडचे सरपंच श्री. सुहास पाटील, श्री. गजानन कल्लोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तरी नागरिकांनी मास्क घालून गर्दी न करता हे औषध घ्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.