बार्शी (जिल्हा सोलापूर) – शहरात शासकीय लसीकरण केंद्राच्या समोर २३ एप्रिल या दिवशी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवसभर रांगेत उभारून नागरिक लस घेत होते. त्यामुळे नागरिकांची गर्दी हटवण्यासाठी तसेच रांगा लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बार्शी शहर आणि तालुका येथे कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे.
शासनाने शुल्क घेऊन लसीकरण करणार्या रुग्णालयांना २२ एप्रिल या दिवशी लसीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे शासकीय केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने प्रशासनाला तेथे पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला.
कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक गर्दी करत आहेत ! – डॉ. अशोक ढगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी
मागील ३ मासांपासून नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शासनस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नागरिक अचानक गर्दी करत आहेत. शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयाला २२ एप्रिल या दिवशी लसीचा पुरवठा करण्यात आला नसल्याने शासकीय केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वांना लस मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.