सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – कोरोना काळातही समस्त सातारावासियांसाठी जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणार्या कर्मचार्यांना सातारा नगरपालिका प्रशासनाने एक आनंद वार्ता दिली आहे. सातारा नगरपालिकेत काम करणार्या ४५५ कर्मचार्यांना मे मध्ये लागू झालेल्या ७ व्या वेतन आयोगाचा अनुशेष (फरक) दिला जाणार आहे.
सातारा नगरपालिकेच्या वतीने नगरविकास विभागाकडे साहाय्यक अनुदानासाठी पाठपुरावा केला होता. राज्याच्या वित्त विभागाने याला अनुमती दिली असून पुढील मासापासून हा अनुशेष दिला जाणार आहे. साहाय्यक अनुदानापोटी सातारा नगरपालिकेला १ कोटी ६८ लाख ३ सहस्र ९१८ रुपये प्राप्त झाले आहेत. यातून सेवानिवृत्त कर्मचार्यांना ७ व्या वेतन आयोगातील अनुशेषापोटी ८२ लाख ६२ सहस्र २१० रुपये देण्यात आले आहेत.