कोल्हापूर – कोरोनाविषयी प्रतिदिनच्या चाचण्या वाढवा, व्हेंटिलेटर्स आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा आढावा घ्या, सनियंत्रण करा. कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (संपर्क शोध मोहिम) वाढवा, अशी सूचना पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी केली. देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्हा नियोजन समिती व्यय, कोरोना व्यय, लसीकरण याविषयी आढावा बैठक घेतली. त्यात ही सूचना त्यांनी दिली.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, आजअखेर ३ लाख ४५ सहस्र ९७९ चाचण्या केल्या असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६.२८ टक्के इतका आहे.