यापुढे मुंबईमध्ये घरातील विलगीकरण बंद, संशयित व्यक्तीला ‘कोविड सेंटर’ मध्ये जावेच लागेल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर

सौ. किशोरी पेडणेकर

मुंबई – यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली. मुंबईमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लग्नसमारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसे दिसली, तर तसेच सामाजिक अंतर किंवा मास्कचा उपयोग यांविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होईल, अशी चेतावणी दिली आहे.