रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून कर्नाटक येथील जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

१. रामनाथी आश्रमासारखे पूज्य स्थान निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् भगवंतच आहेत !

सनातनचा रामनाथी आश्रम हे पूज्य स्थान निर्माण करणे, हे मानवाला शक्य नाही; कारण या आश्रमाच्या कणाकणामध्ये अनुशासन आणि चैतन्य भरलेले आहे. हे त्या भगवंतालाच शक्य आहे. हे पाहून परात्पर गुरूंनी हे स्थान निर्माण केले आहे आणि तेच सांभाळत आहेत, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् भगवंतच आहेत. त्यांच्या कोमल चरणी नतमस्तक होऊन वंदन करतो.

– श्री. यमनप्पा भजंत्री, निडगुंदी, जि. विजयपूर, कर्नाटक. (८.६.२०१८)

२. आश्रम पहातांना मला पुष्कळ आनंद होत होता. असे पुण्य स्थळ पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले, ही आमची पुण्याई !

३. गुरुदेवांचा वाढदिवसाचा सोहळा ज्या कक्षात झाला, त्या कक्षात प्रवेश करत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येऊन मला आनंद झाला.

– सौ. सुवर्णा भजंत्री, निडगुंदी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक (८.६.२०१८)

४. समाजामधील अव्यवस्था आणि आश्रमामधील नीटनेटकेपणा पाहून दोन्हींतील भेद लक्षात आला. आश्रमात सगळीकडे पुष्कळ प्रकाश वाटत होता.

– श्री. प्रशांत उप्पीनंगडी, पुत्तूर, मंगळुरू, कर्नाटक आणि श्री. योगेश के., मंगळुरू (८.६.२०१८)

५. आश्रम पहातांना अधूनमधून माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता आपोआप होत होती.

– श्री. योगेश के., मंगळुरू (८.६.२०१८)

६. आश्रम पुष्कळ चैतन्यमय आहे. आश्रम पहातांना शरिरावर रोमांच येत होते.

– श्री. हरिप्रसाद शेट्टी, युवा घटक अध्यक्ष, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (८.६.२०१८)

७. आश्रम पाहिल्यावर येथेच रहावे, असे वाटले. हा केवळ आश्रमच नाही, तर अयोध्येचे राममंदिरही आहे, असे वाटले.

– श्री. संतोष बा. सिंधे, गलगली, जिल्हा बागलकोट. (८.६.२०१८)

८. आश्रम पाहून मला आनंदाची अनुभूती आली, तसेच शांती आणि समाधान वाटले.

– श्री. गिरीश, उडुपी, मणिपाल, कर्नाटक. (८.६.२०१८)

९. हिंदु संस्कृती टिकून आहे, हे येथे पहायला मिळाले.

– श्री. वसंत कुमार सी. मंचळ्ळी, चिक्कमंगळुरू, कर्नाटक. (७.६.२०१८)


सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

१. सूक्ष्म जगताचे प्रदर्शन पाहिल्यावर आम्हाला ठाऊक नसलेल्या असंख्य गोष्टी आहेत, हे आज आम्हाला समजले. सूक्ष्म नकारात्मक आणि अनिष्ट शक्ती मनुष्यावर कशा प्रकारेे आक्रमण करतात ?, हे पाहून माणसाला त्रास कसा होतो ?, हे लक्षात आले.

– सौ. सुवर्णा भजंत्री, एस्.बी.जी. कॉम्प्युटर शिक्षण संस्था, निडगुंदी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक. (८.६.२०१८)

२. मानवामध्येे नकारात्मक शक्तीचा संचार झाल्याने माणसे पुष्कळ त्रास अनुभवत आहेत; पण हे कशामुळे झाले ?, हे त्यांना कळत नाही. आपण सतत साधनारत राहिलो, तरच सूक्ष्मातील कळायला लागेल आणि हे त्रास कसे दूर करायचे ?, हे समजले.

– श्री. यमनप्पा भजंत्री, एस्.बी.जी. कॉम्प्युटर शिक्षण संस्था, कॉलेज रोड, निडगुंदी, जि. विजयपूर, कर्नाटक. (८.६.२०१८)

  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक