मंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका कु. माधवी पै पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

येथील साधिका कु. माधवी पै या पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापालाच्या (सी.ए.ची) अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. दोन ग्रुपमध्ये एकाच वेळी उत्तीर्ण होऊन त्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. मंगळुरूच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांची ती सर्वांत मोठी कन्या आहे.

भारत उपग्रहाद्वारे श्रीमद्भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह ‘सतीश धवन सॅटेलाईट’ याच्या समवेत श्रीमद्भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि २५ सहस्र भारतीय नागरिकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहेत.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना ‘मास्क’ न वापरल्याने दंड

‘मास्क नाही, प्रेवेश नाही’ या राज्यशासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे पालघरमध्ये समोर आले असून ‘मास्क’ बांधला नाही म्हणून पालघरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना २०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

ब्रिटिशांच्या विरोधात मृत्यूनंतरही लढण्याचा निर्धार करून तरुणांसमोर जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवणारे क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके !

‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मी बंड पुकारले !

मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याची कुटुंबियांनी दिली चेतावणी

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

‘रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक प्रथम दर्जाचा योग झाला असेल, तर व्यक्ती पराक्रमी, साहसी, शूर, जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असते. अशा व्यक्तींमध्ये दृढ आत्मविश्‍वास आणि नेतृत्वगुण असतो.

रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !

अफगाणिस्तानच्या दौलताबादमधील कुलतक गावामधील एका मशिदीमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी तरुणांचा मृत्यू झाला.

नागपूर येथे ‘ऑनलाईन गेम’च्या आहारी जाऊन ३ अल्पवयीन मुलांनी घर सोडले  !

लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवल्यास अशा घटना कधीही घडणार नाहीत. यासाठी पालकांनी स्वतः धर्मशिक्षण घेऊन मुलांनाही ते दिले पाहिजे. यातून चांगले संस्कार आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे अधोरेखित होते !