भारत उपग्रहाद्वारे श्रीमद्भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

नवी देहली – खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह ‘सतीश धवन सॅटेलाईट’ याच्या समवेत श्रीमद्भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि २५ सहस्र भारतीय नागरिकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहेत. यापूर्वी ‘नासा’कडून अशा प्रकारे अनेकदा लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची सूची अंतराळात पाठवण्यात आली. या ‘नॅनो’ उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून त्यामध्येच ही नावे असणार आहेत.