डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ !
पाकला नष्ट केल्याविना भारतातील जिहादी आतंकवादी आणि त्यांचा धोका नष्ट होणार नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन सरकारने कृती करणे आवश्यक !

नवी देहली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य करण्याचा कट पाकमधील आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदने रचल्याची माहिती उघडकीस आली आहे. जैशच्या अटक करण्यात आलेल्या हिदायत-उल्लाह- मलिक या आतंकवाद्याच्या चौकशीतून त्याने डोवाल यांचे घर, कार्यालय, तसेच सरदार पटेल भवन आणि देहलीतील अन्य महत्त्वाची ठिकाणे यांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर डोवाल यांचे कार्यालय आणि घर यांच्याभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पाकमधील प्रमुखाकडून टेहळणी करण्यास सांगण्यात आल्याची माहिती मलिक याने चौकशीत दिली आहे. मलिक याने डोवाल यांच्या कार्यालय परिसराची व्हिडिओच्या माध्यमातून टेहळणी कल्याची माहिती दिली. तो काश्मीरच्या शोपियाचा रहिवासी आहे. त्याला ६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा